सामाजिक

हरेगावात मतमाऊली यात्रेत उसळला भाविकांचा महापूर! देशभरातून लाखो भाविकांनी लावली हजेरी.

श्रीरामपूर : तालुक्यात वसलेल्या हरेगावमध्ये सध्या भक्तीचा अभूतपूर्व महापूर पाहायला मिळतोय. नवसाला पावणारी आई म्हणून संपूर्ण देशात ख्याती असलेल्या मतमाऊलीच्या यात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. मुंबईच्या जगप्रसिद्ध वांद्रे माऊंट मेरी यात्रेनंतर राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी ख्रिस्ती भाविकांची यात्रा म्हणून हरेगावच्या मतमाऊली यात्रेची ओळख आहे. यंदा या ऐतिहासिक यात्रेचे ७८ वे वर्ष असून, माऊलीच्या चरणी लीन होण्यासाठी देशभरातून तब्बल ७ ते ८ लाख भाविक दाखल झाले आहेत. गेल्या ७८ वर्षांची अखंड परंपरा लाभलेल्या हरेगावच्या मतमाऊली यात्रेत यंदा भाविकांचा जनसागर उसळला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक विविध वाहनांनी, तर हजारो भाविक शेकडो किलोमीटरची पायपीट करत पायी दिंड्या घेऊन हरेगावात दाखल झाले आहेत. संपूर्ण परिसर ‘मतमाऊली की जय’च्या जयघोषाने दुमदुमून गेला असून, पारंपरिक धार्मिक विधी, प्रार्थना आणि मिस्सा अर्पणाने संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले आहे. नवस फेडण्यासाठी आणि माऊलीचे शुभाशीर्वाद घेण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. प्रशासनाकडून चोख बंदोबस्त आणि यात्रा कमिटीकडून भाविकांसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. यासंदर्भात संत तेरेसा चर्च मत माऊली तीर्थक्षेत्र हरेगाव येथील प्रमुख धर्मगुरू फादर डॉमिनिक रोझारीओ यांनी अधिक माहिती दिली…

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!