• लाईव्ह टीव्ह
  • अंतरराष्ट्रीय
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • कला-क्रीडा
  • सांस्कृतिक
  • गुन्हे
  • चॉफर कॅनोसा
  • व्हिडीओ
  • रेडिओ
  • लाईव्ह टीव्ह
  • अंतरराष्ट्रीय
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • कला-क्रीडा
  • सांस्कृतिक
  • गुन्हे
  • चॉफर कॅनोसा
  • व्हिडीओ
  • रेडिओ
Breaking News
  • जनसेवा फौंडेशनच्‍या हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद.
Home महाराष्ट्र

श्रीरामपुरातील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास; अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा

Jayesh Sawant by Jayesh Sawant
January 30, 2025
in महाराष्ट्र
0
Encroachment
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

Encroachmentश्रीरामपूर – श्रीरामपूर नगरपालिकेने अतिक्रमण धारकांना सात दिवसांपूर्वी दिलेल्या नोटिसीची मुदत संपल्यानंतर २८ जानेवारी २०२५ रोजी सकाळी साडेदहा वाजता नगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, अतिक्रमण अधिकारी संजय शेळके, नगर अभियंता सूर्यकांत गवळी आदींसह पोलीस बंदोबस्तात शहरातील बेलापूर रोड पासून रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यास प्रारंभ केला.अनेक ठिकाणी अतिक्रमणधारक आजच्या दिवस मुदत द्या, अतिक्रमण काढून घेतो, अशी विनंती करत होते परंतु प्रशासनाने धडक कारवाई सुरू केल्याने मोठ्या प्रमाणात लोकांच्या मालमत्ता जमीनदोस्त झाल्या.लोकांनी स्वयंस्फूर्तीने आपली अतिक्रमणे काढली. श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे व शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विशेष कृती दलाच्या तुकडीसह महिला पोलीसही यामध्ये सहभागी झाले असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्याने कोणीही फारसा प्रतिकार केला नाही. दोन जेसीबी, फायर फायटरची गाडी आणि इतर नगरपालिकेचा स्टाफ यांच्या सहकार्याने सदरची अतिक्रमण मोहीम राबविली गेली. यावेळी रस्त्यावर बघ्यांची खूप मोठी गर्दी झालेली आहे. बेलापूर रोडला पश्चिम बाजूने ही मोहीम सुरू झाल्यानंतर पूर्वेकडील लोकांनी स्वयंस्फूर्तीने आपली अतिक्रमणे काढली. खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पत्र्याचे शेड, दुकाने पुढे आल्याचे दिसून आले. अनेकांनी आपले सामान हलवण्यासाठी पूर्ण कुटुंब रस्त्यावर उतरवल्याचे दिसत होते.सदरची अतिक्रमण मोहीम थांबवावी किंवा दुकानदारांचा सहानुभूतीने विचार करावा याबाबत शहरातील राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींनी जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन साकडे घातले. आमदार हेमंत ओगले, माजी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक, माजी उपनगराध्यक्ष करण ससाने आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून याबाबत विनंती केली. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी शासन नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांना दिल्याने पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ही मोहीम राबविली गेली. सदरची मोहीम सुरू राहणार असून नागरिकांनी आपापली अतिक्रमणे काढून घेऊन आपले नुकसान टाळावे व नगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी केली आहे.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मोठा पोलीस बंदोबस्त पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ही मोहीम राबविली गेल्याने कोणालाही प्रतिकार करायची संधी मिळाली नाही. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, उपमुख्य अधिकारी महेंद्र तापकीरे, नगर अभियंता सूर्यकांत गवळी, किरण जोशी, अभिषेक मराठे, पूजा लांडगे, लक्ष्मण लबडे, अतिक्रमण अधिकारी अनंत शेळके, संजय शेळके, गौरव यादव, रवींद्र इंगळे यांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसह सकाळी पश्चिम बाजूने बेलापूरच्या दिशेने अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली. पश्चिमेकडे होणारी धडकी भरविणारी कारवाई पाहून पूर्वेकडील दुकानदारांनी तातडीने आपली अतिक्रमणे काढून आपले साहित्य वाचवण्याचा प्रयत्न केला. एका ठिकाणी काही महिलांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख व महिला पोलिसांनी त्यांना तिथून बाहेर काढून जेसीबी लावला व पूर्ण शेड काढून टाकण्यात आले.

Next Post

जनसेवा फौंडेशनच्‍या हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद.

Jayesh Sawant

Jayesh Sawant

Next Post
जनसेवा फौंडेशनच्‍या हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद.

जनसेवा फौंडेशनच्‍या हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

October 12, 2026
हरेगावात मतमाऊली यात्रेत उसळला भाविकांचा महापूर! देशभरातून लाखो भाविकांनी लावली हजेरी.

हरेगावात मतमाऊली यात्रेत उसळला भाविकांचा महापूर! देशभरातून लाखो भाविकांनी लावली हजेरी.

October 7, 2026

श्रीरामपूर हादरले! कुंभरगल्लीत चार बंद घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास; नागरिक भयभीत

May 26, 2025

बेलापुरातील प्रवरा नदीपात्रात अज्ञात व्यक्तीची उडी; गेल्या ६ तासांपासून बचावकार्य सुरू!

September 27, 2025

नामदार विखेंमुळेच भाजपा संपणार -चित्ते.

1
Encroachment

श्रीरामपुरातील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास; अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा

0
जनसेवा फौंडेशनच्‍या हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद.

जनसेवा फौंडेशनच्‍या हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद.

0

शिर्डी दुहेरी हत्याकांडातील आरोपी १२ तासाच्या आत जेरबंद, स्थानिक गुन्हेशाखेची कारवाई….

0
साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

October 12, 2026
हरेगावात मतमाऊली यात्रेत उसळला भाविकांचा महापूर! देशभरातून लाखो भाविकांनी लावली हजेरी.

हरेगावात मतमाऊली यात्रेत उसळला भाविकांचा महापूर! देशभरातून लाखो भाविकांनी लावली हजेरी.

October 7, 2026
शंभुक वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना लोकसहभागातून स्कूल बॅग आणि साहित्याचे वाटप.

शंभुक वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना लोकसहभागातून स्कूल बॅग आणि साहित्याचे वाटप.

September 13, 2026

श्रीरामपूरात गुन्हेगारांचा हैदोस,काँग्रेस आमदार ओगले यांच्या दोन्ही ड्रायव्हरला बेदम मारहाण!

October 16, 2025

Recent News

सर्वोत्तम मराठी बातम्या आणि ब्लॉगसाठी तुमचे आवडते ठिकाण snewsmarathi.com/ वर तुमचे स्वागत आहे. आम्ही तुमच्यासाठी देश-विदेशातील ताज्या बातम्या, सखोल विश्लेषण आणि विविध विषयांवरील लेख आणतो जे तुमचे ज्ञान समृद्ध करतील आणि तुमचे मनोरंजन करतील.
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा
Facebook Twitter Instagram Youtube Telegram
  • लाईव्ह टीव्ह
  • अंतरराष्ट्रीय
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • कला-क्रीडा
  • सांस्कृतिक
  • गुन्हे
  • चॉफर कॅनोसा
  • व्हिडीओ
  • रेडिओ
  • लाईव्ह टीव्ह
  • अंतरराष्ट्रीय
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • कला-क्रीडा
  • सांस्कृतिक
  • गुन्हे
  • चॉफर कॅनोसा
  • व्हिडीओ
  • रेडिओ

अलीकडील पोस्ट

  • साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.
  • हरेगावात मतमाऊली यात्रेत उसळला भाविकांचा महापूर! देशभरातून लाखो भाविकांनी लावली हजेरी.
  • शंभुक वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना लोकसहभागातून स्कूल बॅग आणि साहित्याचे वाटप.
  • श्रीरामपूरात गुन्हेगारांचा हैदोस,काँग्रेस आमदार ओगले यांच्या दोन्ही ड्रायव्हरला बेदम मारहाण!
  • बेलापुरातील प्रवरा नदीपात्रात अज्ञात व्यक्तीची उडी; गेल्या ६ तासांपासून बचावकार्य सुरू!
  • श्रीरामपूर पोलिसांची 'धडाकेबाज' कारवाई! ५ तलवारीसह २० वर्षीय गुलाबनबी जेरबंद.
  • जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त श्रीरामपूरात 'नशामुक्ती'चा अनोखा संदेश!
  • पोलिसांची मोठी कारवाई श्रीरामपूरात ३ गावठी पिस्तूलसह चौघे आरोपींना अटक
  • 'ऑपरेशन सिंदूर' समर्पित रक्तदान शिबिरातून; श्रीरामपुरातील तरुणांनी घडवला नवा आदर्श.
  • शिवसमराज्य युवा कार्यक्रमात महिलांचा जल्लोष! 'होम मिनिस्टर' कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद.
  • पालिकेच्या शाळेत लहान मुलांकडून मजुरी! रात्री मुख्याध्यापकाच्या उपस्थितीत सुरू होता प्रकार...
  • शिर्डीत सुजय विखेंचे अज्ञातांनी बॅनर फाडले,विखे समर्थकांची पोलिसांत धाव;पोलिसांचा तपास सुरू.
  • श्रीरामपूर शहरात हरकल कुटुंबियांवर शोककळा - सौ. अलका हरकल यांचे निधन.
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पोलीस दलात मोठे फेरबदल
© 2024 सर्व हक्क राखीव!