महाराष्ट्र सामाजिक

श्रीरामपूर नगरपरिषदेतील भ्रष्ट दोषी अधिका-यांवर कारवाईसाठी नोटाफेक आंदोलन…

श्रीरामपूर : शहरातील नागरिक श्रीरामपूर नगरपरिषदेस करापोटी कोट्यवधी रुपयांच्या कर भरते मात्र जनतेच्या पैश्यातून पालिकेतील काही अधिकारी हे आपले खिशे भरत असल्याने भ्रष्ट आणि दोषीं अधिका-यां विरोधात आझाद हिंद भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वेळो वेळी पुरावे देऊन देखील अद्याप कोणतीही कारवाई होत नसल्याने आज श्रीरामपूर नगरपरिषदेच्या गेट आणि मुख्याधिकारी यांच्या दालनास प्रतिकात्मक नोटांचे तोरण बांधून जोरदार घोषणाबाजी करत प्रतिकात्मक चलनी नोटा फेकून आंदोलन करण्यात आले. यावेळी फेरीवाला निवडणूकित १ लाख रुपयांचा अपहार प्रकरण, शहरातील स्टोल वाटप गैरव्यवहार प्रकरणी चौकशी समिती समोर दोषी सिद्ध झालेल्या अधिकाऱ्यांवर दोषारोप दाखल करण्यात यावे,दैनिक बाजार फी वसुली ठेकेदाराकडून पालिका कराराचे भंग होऊन देखील त्यास मुदतवाढ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, शहरातील मुख्याधिकारी निवास भवन दुरुस्तीच्या नावाखाली खोटे बिले उकळल्यानाऱ्यावर कारवाई करण्यात यावी,२०२४ मधील आचारसंहिते दरम्यान कामात कसुरी करणाऱ्या आधीकाऱ्यां विरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाने कारवाई करावी याकरिता ३ पत्र दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी आझाद हिंद भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे अमित मुथा यांनी करत श्रीरामपूर नगरपरिषदेच्या माध्यमातून होत असलेल्या भष्ट्राचाराचे अनेक पुरावे देखील प्रसार माध्यमांसमोर सादर केल्याने श्रीरामपूर पालिकेच्या कारभारावर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!