
श्रीरामपूर – श्री भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळ्या निमित्त ब्राह्मण सेवा संघ, ब्राह्मण युवा संघाने श्रीरामपूर शहरात भगवान परशुरामांच्या जिवंत देखाव्यासह भव्य शोभा यात्रेचे आयोजन केले होते. शहरातील छ. शिवाजी महाराज रोड – मेन रोड मार्गे काढण्यात आलेली ही शोभा यात्रा जेव्हा शहिद भगतसिंग चौक येथे आली असता विविध मान्यवरांनी या शोभा यात्रेचे जंगी स्वागत केले यावेळी भाजपचे मा. नगरसेवक रवी पाटील, मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे पाटील, ब्राह्मण सेवा संघाचे अध्यक्ष सचिन गुरु जोशी, ब्राह्मण युवा संघाचे अध्यक्ष सुबोध शेवतेकर, उमेश कुलकर्णी, विनायक विप्रदास, विश्वनाथ आवटी, अभिजित कुलकर्णी, योगेश ओझा, अवधूत कुलकर्णी, कार्तिक मांडवे, सागर म्हस्के, अमोल कांबळे, कुणाल कुंभकर्ण, संकेत पाटील, सिद्धांत पाटील, प्रतीक वैद्य, मंदार पावसे, महेश जोशी, ऋषिकेश सुरडकर, रुद्रप्रताप कुलकर्णी, संकेत जोशी आदी उपस्थित होते.