शिर्डीत सुजय विखेंचे अज्ञातांनी बॅनर फाडले,विखे समर्थकांची पोलिसांत धाव;पोलिसांचा तपास सुरू.

शिर्डी : शहरातील लक्ष्मीनगर भागात रविवारी मध्यरात्री अज्ञातांनी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या बॅनरची तोडफोड केली.फक्त बॅनरवरच नव्हे तर परिसरात उभ्या असलेल्या काही दुचाकींची अज्ञातांनी तोडफोड केलीये.या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून विखे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी आहे. घटनेची माहिती मिळताच माजी खासदार डॉक्टर सुजय विखे समर्थक मोठ्या संख्येने शिर्डी पोलिस ठाण्यात धाव घेतली. समर्थकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.शिर्डी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून घटनेचा शोध शिर्डी पोलिस घेताय.विखे पाटलांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या शिर्डीतच अशी घटना घडल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.याबाबत विखे समर्थकांनी अधिक माहिती दिलीये. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रकारामागे नेमके कोणते राजकीय कारण दडले आहे का..? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.सध्या या घटनेमुळे सुजय विखे समर्थकांमध्ये संतापाचे वातावरण असून, पोलिस तपासात काय निष्पन्न होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.