
श्रीरामपूर : शहर पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रांविरोधात मोठी मोहिम उघडली असून, दोन दिवसांपूर्वी श्रीरामपूर मध्ये ३ गावठी पिस्तुल जप्त केल्यानंतर आता पुन्हा एकदा मोठी कारवाई करत पोलिसांनी ५ बेकायदेशीर तलवारींसह एका आरोपीला जेरबंद केले आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे शहरात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. शहरातील वार्ड नंबर २ परिसरात पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून गुलाबनबी अन्वर शेख या २० वर्षीय युवकाला बेकायदेशीररित्या तलवारी बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३ हजार रुपये किमतीच्या पाच तलवारी हस्तगत करण्यात आल्या आहेत.काही दिवसांपूर्वीच तीन गावठी पिस्तुलांचा मोठा साठा जप्त करणाऱ्या श्रीरामपूर शहर पोलिसांनी पुन्हा एका कारवाईत ५ तलवारी जप्त करत शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर वचक निर्माण केला आहे. आरोपी गुलाबनबी शेख याच्याविरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे.
👉 संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈
शहर पोलिसांच्या या सलग आणि मोठ्या कारवाईमुळे गुन्हेगारी कृत्यांसाठी अवैध शस्त्रांचा वापर करू पाहणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आता अधिक आक्रमक झाले असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली खाली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके,सहाय्यक फौजदार सुर्यवंशी, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रसाद साळवे, पोलीस नाईक संदीप दरंदले, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी खरात, संपत बडे,मच्छिंद्र कातखडे, अजित पटारे, धनंजय वाघमारे,रवींद्र शिंदे,सचिन दुकळे, बाळासाहेब गिरी आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल उज्वला मुसमाडे यांनी केली असून. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र त्रिभुवन हे करत आहेत.