गुटख्याच्या साम्राज्यावर सर्जिकल स्ट्राईक; संतोष खाडेंच्या पथकाची मोठी कारवाई.
कोपरगाव – पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाने कोपरगाव येथे मोठी कारवाई करत अवैध गुटख्याने भरलेला ट्रक पकडला आहे. समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजवर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल ६४ लाख ८० हजार रुपये किंमतीचा गुटखा आणि ट्रकसह एकूण ७६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध गुटखा प्रकरणी पोलिसांनी तेलंगणा येथील अकिल शेख याला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली आहे. खाडे यांच्या पथकाने यापूर्वी श्रीगोंदा येथेही अवैध गुटख्याविरोधात मोठी कारवाई केली होती.
विशेष पोलीस पथकाच्या या धडक कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांविरोधात ही मोहीम यापुढेही अधिक तीव्र केली जाईल, असा इशारा परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी दिला आहे. या मोठ्या कारवाईमुळे कोपरगाव आणि परिसरात अवैध गुटख्याच्या विक्रीला मोठा लगाम बसण्याची शक्यता आहे. विशेष पथकाच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाचे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे,पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, सहाय्यक फौजदार शकील शेख, पोलीस हेडकॉन्स्टेबल शंकर चौधरी,अरविंद भिंगारदिवे, अजय साठे, मल्लीकार्जुन बनकर,दिनेश मोरे, दिगंबर कारखिले, उमेश खेडकर, पोलीस कॉन्स्टेबल सुनिल दिघे,अमोल कांबळे,जालिंदर दहिफळे, दिपक जाधव,विजय ढाकणे यांच्या पथकाने केली असून. पोलीस अधीक्षक घार्गे यांच्या विशेष पोलीस पथकाकडून जिल्ह्यात होते असलेल्या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.