रेल्वे सुरक्षा बल जवानांचा फ्लॅग मार्च ; रेल्वे स्थानक सुरक्षेबाबत केली तपासणी.
अहिल्यानगर – पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्याबाबत आदेश देण्यात आल्याने, सुरक्षा प्रणालीतील सर्वच विभाग सतर्क झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रशासन आणि लोहमार्ग पोलीस प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्थेबाबत संयुक्त राबविण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत रेल्वेच्या वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त श्रीमती प्रियांका शर्मा,सह आयुक्त सुनील जाटे यांच्या आदेशान्वये आज अहिल्यानगर रेल्वे स्थानक येथे रेल्वे सुरक्षा बल पोलीस निरीक्षक बेनी प्रसाद मीना यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलीस प्रशासनाच्या वतीने फ्लॅग मार्च काढण्यात आला.