चौफेर कानोसा सामाजिक

श्रीरामपूर शहरात हरकल कुटुंबियांवर शोककळा – सौ. अलका हरकल यांचे निधन.

श्रीरामपूर: शहरातील परिचित व्यक्तिमत्त्व आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रुपेश हरकल यांच्या मातोश्री, सौ. अलका सुभाष हरकळ यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर अहिल्यानगर येथील मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

अलका हरकळ या त्यांच्या प्रेमळ, हसतमुख आणि नेहमी इतरांच्या मदतीला धावून जाणाऱ्या स्वभावामुळे सर्वांना प्रिय होत्या. त्यांनी आपल्या मुलांचे आणि मुलींचे संगोपन अतिशय कष्टाने केले आणि कुटुंबाला नेहमीच खंबीर साथ दिली. त्यांच्या पश्चात त्यांचे पती सुभाष हरकल, दोन मुले रुपेश आणि प्रकाश, दोन मुली, सुना, जावई आणि नातवंड असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण हरकळ कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची अंत्ययात्रा आज, बुधवार, २० ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता सरस्वती कॉलनी, श्रीरामपूर येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या निधनाबद्दल राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!