श्रीरामपुरात मध्यरात्री थरार! प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञांच्या मुलाने दारूच्या नशेत उडवली रिक्षा; संगमनेर रोडवर भीषण अपघात
श्रीरामपूर : शहरात रात्री १० वाजेच्या सुमारास एक मोठी दुर्घटना घडली आहे. शहरातील एका प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर पुत्राने दारूच्या नशेत गाडी चालवत असताना दोन प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिली. सदरचा अपघात एम एच १७ सी एम १५१५ क्रमांकाच्या हॅरियर गाडीमुळे झाला असून. मद्यधुंद अवस्थेतील अनिकेत शिरसाठ हा भरधाव वेगात गाडी चालवत असतांना त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने, गाडी थेट रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दोन प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला जाऊन धडकली. या धडकेत रिक्षा अक्षरशः १० फूट लांब उडाली त्यामुळे रिक्षाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सदर अपघाताची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी, अपघातामुळे निर्माण झालेली वाहतुकीची कोंडी मोकळी करत वाहतूक सुरळीत केली. सदरची गाडी चालवत असलेला मद्यधुंद अवस्थेतील डॉक्टर पुत्रास प्रत्येक्ष दर्शींनी ओळखल्याने एकाच खळबळ उडाली.. त्यानंतर काही लोकांनी त्या मद्यधुंद अवस्थेतील युवकास पसार केले. आपघातातील गाडीचा वेगाची प्रचंड होता आणि त्यामुळेच त्याला गाडीवर ताबा राखता आला नसल्याने हा भीषण अपघात झाला. रात्रीच्या सुमारास झालेल्या या आपघातामुळे शहरात एकच चर्चा रंगली असून. एका प्रतिष्ठित डॉक्टरांच्या मुलाने अशा प्रकारे निष्काळजीपणे गाडी चालवून अपघात केल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. सदरच्या अपघाता नंतर कारवाई होऊ नये याकरिता पोलिसांवर देखील दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नसून. कायदा सर्वांसाठी सारखच असतो हे संबंधित मद्यधुंद युवकावर कारवाई करून पोलिसांना दाखवे लागणार आहे. त्यामूळे आता पोलीस काय कारवाई करतात,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.