श्रीरामपुर : तालुक्यातील मातुलठाण येथील गोदावरी नदी पात्रातुन सुरू असलेल्या अवैध वाळू उपश्या विरोधात श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक कार्यालय आणि श्रीरामपुर तालुका पोलीस ठाण्याची संयुक्त कारवाई करत ८ ट्रॅक्टर ,१ जेसीबी सह ५४ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय, पोलीस पथकाची चाहुल नदीपात्रातुन साधने नदी पात्रात सोडून पळून जात असतांना, पथकाने आकाश अभिमन्यु ठोंबरे वय वर्ष २० राहणार पुरणगाव ता. वैजापुर ,अतीश दत्तु रोठे वय वर्ष २० वर्ष राहणार हिंगोणी ता.वैजापुर, गणेश कैलास पवार वय वर्ष २४ राहणार लाखगंगा ता. वैजापुर ,सुमित धर्मराज ठोंबरे वय वर्ष १९ राहणार पुरणगाव ता. वैजापुर या चौघांना ताब्यात आरोपीं विरोधात भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम ३०३(२),३(५) सह पर्यावरण कायदा कलम ३/१५ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास श्रीरामपुर तालुका पोलीस करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधीकारी डॉ. बसवराज शिवपुजे, श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली परि. पोलीस अधीक्षक तथा श्रीरामपुर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी रॉबिन बन्सल,अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी, पोलीस नाईक सचिन धनाड,रामेश्वर वेताळ, पोलीस कॉन्स्टेबल सुनिल दिघे, तसेच श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस सब इंस्पेक्टर सतिष डौले, संदिप मुरकुटे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत रननवरे,विनोद कुदनर, होमगार्ड सागर कोळपे, राम मोरे आदींच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. अवैध वाळू तस्करी विरोधात अपर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपुर व श्रीरामपुर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेल्या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
Recent Posts
- श्रीरामपुरात मध्यरात्री थरार! प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञांच्या मुलाने दारूच्या नशेत उडवली रिक्षा; संगमनेर रोडवर भीषण अपघात
- गुटख्याच्या साम्राज्यावर सर्जिकल स्ट्राईक; संतोष खाडेंच्या पथकाची मोठी कारवाई.
- जिल्हयाची कायदा व सुव्यवस्था दोन्ही ‘सोमनाथांच्या’ हाती; वाघचौरे श्रीरामपूरचे नवे अपर पोलीस अधीक्षक.
- लवळे शाळेला अध्यक्ष चषक आणि गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान!
- श्रीरामपुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेवरून वाद, आज मशाल मोर्चा.