श्रीरामपूर – पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर,अखेर भारतीय लष्कराकडून रात्री दीड वाजेच्या सुमारास दहशतवादा विरोधात एअर स्ट्राईक करण्यात आली आहे. ज्यात बहावलपूर, मुझ्झफराबाद आणि कोटली येथील दहशवादी तळावर डागल्या ९ मिसाईल डागल्या, राफेलच्या SCALP मिसाईलनं करण्यात आलेला हल्ला हा पाकिस्तानी नागरिक आणि लष्करा ऐवजी थेट दहशवादी तळावर करण्यात असल्याची माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली आहे. भारतीय लष्कराकडून करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूर ची माहिती,अमेरिका, रशिया, ब्रिटन,सौदी अरेबिया, UAE ला देण्यात आली असून.पहेलगाम हल्ल्याच्या सूड घेण्यासाठी भारतीय लष्कराकडून कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे.एअर स्ट्राईक सुरू असतांनाच पाक सैन्याने पंछ राजौरी, कुपवाडामधील सीमा रेषेवर गोळीबार देखील करण्यात आला असून. भारतीय सैन्याकडून पाकच्या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले जात असल्याची माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली आहे.