
श्रीरामपूर : जागतिक फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधत आज श्रीरामपूर शहरात तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन आणि प्रतिभाताई पवार कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्तीचा अनोखा संदेश देण्यात आला. वाढत्या व्यसनाधीनतेबद्दल समाजात जनजागृती करण्यासाठी राबविण्यात आलेल्या या विशेष उपक्रमात कॉलेज ऑफ फार्मसीच्या शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेत शहरातून रॅली काढत नशामुक्ती संदर्भात पथनाट्य सादर करून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. शहरातील गिरमे चौकातून मेन रोड मार्गे काढलेल्या रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. रॅलीच्या माध्यमातून नशामुक्ती संदर्भात जनजागृती करणारे पथनाट्य सादर करण्यात आले, ज्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. व्यसनाच्या दुष्परिणामांची जाणीव करून देत, विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व समजावून सांगणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याची प्रतिक्रिया या रॅलीतील विद्यार्थी आणि आयोजकांनी दिली. यावेळी प्रतिभाताई पवार फार्मसी कॉलेजचे अध्यक्ष दिलीप पवार,प्राचार्य अभिषेककुमार सेन,श्रीरामपूर शहरात तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुजित राऊत,सेक्रेटरी आनंद कोठारी,खजिनदार कोविल खेमनर, ओमशेठ नारंग,गुलाटी ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र गुलाटी,सेंट्रल झोन उपाध्यक्ष शशांक रासकर,उपाध्यक्ष बाळासाहेब ढेगरे राजू बधे,जालिंदर थवार,रवींद्र चौधरी,माधव आसने, प्रशांत उचित, संदीप तुपके,प्रशांत कोठारी,आदींसह प्रतिभाताई पवार फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी – विद्यार्थिनी तसेच शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.