
श्रीरामपूर : अनंत चतुर्दशीच्या मंगलमय दिवशी, गणेश विसर्जनाचे औचित्य साधत, भारतीय सैन्याने पुलावामा हल्ल्याचे प्रतिउत्तर देत, देशाचा स्वाभिमान राखण्यासाठी राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अभियानाच्या स्मरण करत, देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांकरिता,श्रीरामपूर येथे ‘एक रक्तदान देशासाठी, एक बूँद जीवनाची,एक पाऊल राष्ट्ररक्षणाची’ हे प्रेरणादायी घोषवाक्याखाली घेऊन युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष विवेक पारस माटा यांच्या संकल्पनेतून ,शहरातील नॉर्दन ब्रांच येथे भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिराला शहरासह तालुक्यातील तरुण,व्यापारी आणि विविध गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला रक्तदान करून.देशाप्रती आपली जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश दिला. भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ आयोजित या शिबिरात सहभागी झालेल्या रक्तदात्यांनी, “खरा सन्मान हा रक्तदानातूनच होत असल्याचा” संदेश कृतीतून दिला असून. युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष विवेक पारस माटा यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले. शिबिरातून जमा झालेले रक्त शासकीय रुग्णालय तसेच शहरातील रक्तपेढ्यांना दिले जाणार असून, त्याचा उपयोग गरजू रुग्णांसाठी होणार आहे. सामाजिक कार्याची ही अनोखी भेट देत, गणेशोत्सवाचा हा दिवस केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता त्याला सामाजिक जाणीवेची जोड देण्यात आली.