गुन्हे चौफेर कानोसा

घरफोडी टोळी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई.

अहिल्यानगर – जिल्ह्यातील विविध भागांत घरफोडी करून धुमाकूळ घालणाऱ्या एका टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. या कारवाईमुळे नगर तालुका, सुपा, मिरजगाव आणि श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण ५ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, पोलिसांनी आरोपींकडून २ लाख ८४ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.।अहिल्यानगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील रहिवासी जयंत महादु केदार यांच्या घरी काही दिवसांपूर्वी घरफोडी झाली होती. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे व तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये घोसपुरी (ता. नगर) येथील चंदया पिंपळया भोसले, राकेश चंदया भोसले तसेच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील अर्जुन संभाजी काळे आणि गोपीचंद चंदु काळे यांचा समावेश आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी नगर तालुका, सुपा, मिरजगाव आणि श्रीगोंदा येथील घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून घरफोडीतील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि इतर वस्तू असा एकूण २ लाख ८४ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, पोलीस त्या दृष्टीने अधिक तपास करत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कामगिरीमुळे घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होणार असून, नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, तपास पथकातील पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, फुरकान शेख, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, सुनिल मालणकर, प्रशांत राठोड व अरूण मोरे अशांचे पथक आदींच्या पथकाने यशस्वीरित्या पारपाडली.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!