शिर्डीतील गुटखा किंगच्या घरावर पोलिसांचा छापा,आशिष खाबियाच्या ताब्यातून लाखोंचा गुटखा जप्त..!!
शिर्डी – शहरातील गणेशवाडी परिसरातील आशिष खबिया नामक व्यक्तीच्या घरामध्ये शिर्डी पोलिसांनी छापा टाकला असून लाखो रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केलाय.शिर्डी शहरात लाखो रुपयांच्या गुटख्याची तस्करी सुरू असल्याचा प्रकार उघड झाला असून शिर्डी पोलिसांनी ५ लाखांहून अधिक रकमेचा १५ गोण्या,१० बॉक्सहून अधिक गुटख्याचा माल शिर्डी पोलिसांनी जप्त केलाय. कित्येक दिवसांपासून शिर्डी शहरामध्ये लाखो रुपयांच्या गुटख्याची तस्करी गणेशवाडी येथील आशिष खाबिया याच्या कडून सुरू होती आणि मुख्य म्हणजे गणेशवाडी परिसरातील आशिष खावे याने त्याच्या निवासस्थानीच गुटख्याचा लाखो रुपयांचा माल साठवून ठेवला होता. गुप्त बातमीदार मार्फत शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंजीत गलांडे यांना गुटख्याची तस्करी सुरू असल्याची माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारे गलांडे यांच्या पथकाने आशिष खाबिया याच्या घरी छापताखट ५ लाखाहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त केला असून अन्न आणि औषध प्रशासनाचे राजेश बडे हे देखील घटनास्थळी दाखल झाले असून प्रतिबंधित गुटख्याच्या तस्करीबाबत चौकशी सुरू आहे. शिर्डी पोलिसांकडून पोलीस ठाण्यात आशिष खाबिया नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. नामांकित कंपन्यांच्या गुटक्याचा समावेश आलाय.मागील चार दिवसांपूर्वी शिर्डी शहरातील एका टपरीवर स्थानिक पुणे शाखेच्या पथकाने छापा टाकून टपरी व्यवसायिकाला ताब्यात घेतला होता त्याच्याकडून गुटका किंग असणाऱ्या खाब्याचा निवासस्थानी देखील छापा टाकला होता मात्र त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सेटलमेंट केल्याची ही दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. त्यानंतर शिर्डी पोलिसांनी गुटखा किंग असणाऱ्या आशिष खाबियाच्या निवासस्थानी छापा टाकल्याने एकच खळबळ उडालीये. शिर्डी पोलीस गुन्हा दाखल करून आरोपीसह त्याच्या साथीदाराला ताब्यात घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.