गुन्हे

शिर्डी दुहेरी हत्याकांडातील आरोपी १२ तासाच्या आत जेरबंद, स्थानिक गुन्हेशाखेची कारवाई….

शिर्डी दुहेरी हत्याकांडातील आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हेशाखेची कारवाई.

शिर्डी – अहिल्यानगर जिल्हा शिर्डी येथील दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने पुन्हा हादरला,ज्यात शिर्डी विमानतळा जवळील गुंजाळवस्ती येथे रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास दरोड्याच्या उद्देशाने बाप लेकाची निर्गुण हत्या झाल्याची घटना आज सकाळीच उघडकीस आली.. ज्यात साहेबराव पोपट भोसले वय वर्षे ६० आणि त्यांचा मुलगा कृष्णा साहेबराव भोसले वय वर्षे ३० यांचा मृत्यू झाला असून साखरबाई साहेबराव भोसले ही महिला गंभीर जखमी झाल्याने तिच्यावर प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार असतांना… घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जलद गतीने तपासाची चक्रे फिरवत सिन्नर पोलिसांच्या मदतीने नाशिक जिल्ह्यातील पळसे टोल नाक्यावर सापळा रचून पालघर जिल्ह्यातील तेलीम्बरपाडा येथील संदीप रामदास दहाबाड, वय १८ वर्षे आणि जगन काशिनाथ किरकिरे, वय २५ वर्षे या दोघा आरोपींना ताब्यात घेतले असून. दरोड्याच्या उद्देशाने हे हत्याकांड केल्याची कबुली आरोपींनी दिली असून १२ तासांच्या आता स्थानिक गुन्हे शाखेने शिर्डी दुहेरी हत्याकांडाचा तपास पूर्ण केला असून, आरोपीं विरोधात राहाता पोलिस ठाण्यात गुरनं १७१/२०२५ बीएनएस २०२३ कलम १०३ (१), १०९(१), ३११, ३३१ (८) आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबमें, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, यांच्या  सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, सपोनि हेमंत थोरात, पोसई तुषार धाकराव, अनंत सालगुडे यांच्यासह  पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, गणेश लोंढे, संदीप दरंदले, अमृत आढाव, प्रमोद जाधव, जार्लीदर माने, बाळासाहेब खेडकर, रमीजराजा आत्तार, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, प्रशांत राठोड, भगवान थोरात, सुनील मालणकर, बाळासाहेब गुंजाळ, अरूण मोरे, उमाकांत गावडे व चंद्रकांत कुसळकर आदी अधिकारी व अंमलदार यशस्वीपणे पार पाडली.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!