श्रीरामपूर – शहरात पोलिसांनी मोठी कारवाई करत, ३ गावठी पिस्टल, ३ मॅगझीन आणि १० जिवंत काडतुसांसह दोन आरोपींना अटक केली आहे. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने शहरातील वॉर्ड नंबर २, मिल्लतनगर पुलाजवळ सापळा रचून एम एच १२ एल डी ७३३८ क्रमांकाच्या एरिटिका गाडीतून आलेल्या दोघांना ताब्यात घेण्यात असता, आरोपी बबलू उर्फ इम्तियाज शाह, नदीम खान यांच्या ताब्यातून ३ गावठी पिस्टल, ३ मॅगझीन आणि १० जिवंत काडतुसे आणि एरिटिका गाडी असा एकूण ७ लाख ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून. गावठी पिस्तुल प्रकरणी ताब्यात घेतलेला आरोपी बबलू उर्फ इम्तियाज शाह हा श्रीरामपूर तर नदीम खान चाळीस गाव येथील रहिवासी असून हे दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात प्रत्येकी नऊ नऊ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. तसेच पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींनी ज्यांच्यासाठी हे गावठी पिस्तुल आणले होते. त्या बेलापूर येथील ऋतुराज दाणी आणि नंदकिशोर शिरसाठ या दोघां सह पोलिसांनी चौघा आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती,अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे.
👉 गावठी कट्टे कोणी आणि कोणासाठी आणले पाहण्यासाठी क्लिक करा…👈
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधीककारी जयदत्त भंवर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे, पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोलीस हेडकॉन्स्टेबल रविंद्र चव्हाण, सचिन धनाड, पोलीस नाईक काका मोरे, अनिल शेंगाळे, पोलीस कॉन्स्टेबल सतिष पटारे, नितीन शेलार,अजय आंधारे, श्रीरामपुर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र कातखडे,अजित पटारे,संपत बडे तसेच दंगल नियंत्रण पथकातील पोलीस कॉन्स्टेबल सचिन शेळके,ज्ञानेश्वर गायके,अक्षय भोई, राहुल आहिरे आदी अधिकारी अंमलदार यांनी रित्या पारपाडली.
