
श्रीरामपूर – दहशतवादा विरोधात भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानी दहशतवादयांना यमसदनी धाडले, भारत पाक युद्धा दरम्यान अनेक भारतीय जवानांना देशाचे रक्षण करतांना वीरगती प्राप्त झाली. अशा शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज श्रीरामपूर शहरात सकल हिंदू समाज आणि राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने १५० फुटी तिरंगा ध्वजाची रॅली काढून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी शेकडो युवकांसह महिला भगिनी तसेच लहान मुले देखील या रॅलीत सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. शहरातील सिद्धीविनायक मंदिर या ठिकाणाहून सुरू झालेली रॅली मेनरोड,छत्रपती शिवाजीमहाराज रोड मार्गे शाहिद जवान स्मारक याठिकाणी येऊन सांगता करण्यात आली. यावेळी भारत पाक युद्धातील शाहिद जवानांच्या कुटुंबाकरिता, सकल हिंदू समाजाच्या वतीने गोळा करण्यात आलेल्या आर्थिक मदतीचा धनादेश महसूल प्रशासनाच्या स्वाधीन करण्यात आला.