शिवसमराज्य युवा कार्यक्रमात महिलांचा जल्लोष! ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद.
श्रीरामपूर : शहरातील प्रभाग १४ मधील युवा सामाजिक कार्यकर्ते अक्षय गाढेकर यांच्या नेतृत्वाखालील शिवसमराज्य गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सव निमित्त ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला परिसरातील महिला आणि मुलींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे परिसरात आनंदी आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना मंडळाकडून आकर्षक बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. महिलांसाठी आयोजीत ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचा परिसरातील महिला भगिनींनी मनमुराद आनंद लुटतांना पाहायला मिळाल्या..
👉 व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 👈
गेल्या दोन दशकांमध्ये ,उपनगराध्यक्ष, नगरसेवक यासह अनेक राजकीय पदे भूषवून, समाज कार्याचा वसा घेतलेली ही गाडेकर कुटुंबातील तिसरी पिढी देखील अक्षय गाडेकर यांच्या माध्यमातून आजही समाज कार्यात काम करत असतांना पाहायला मिळत आहे. यंदाच्या गणेशोत्सवा निमित्त, नेहमी घरातील कामांमध्ये व्यस्थ असणाऱ्या महिला भगिनींसाठी, होम मिनिस्टर कार्यक्रमकाच्या माध्यमातून एक मनोरंजनाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रभाग १४ मधील महिला भगिनींनी, युवा नेते अक्षय गाढेकर यांचे विशेष आभार मानले.
भारतीय जनता पक्षाचे उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या खंबीर साथ आणि शिवसामराज्य युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तेजस मोरगे यांच्या खंबीर साथीने यंदाच्या वर्षी गणेशोत्सवात अनेक यशस्वी कार्यक्रम घेण्यात आली. ज्यात विशेष म्हणजे शिवसामराज्य युवा प्रतिष्ठानमधील शुभम पगारे, अजिंक्य मोरगे, सिद्धार्थ मोरगे, राहुल गाढेकर, रोहित लोळगे, प्रशांत तांबे, सागर गायकवाड, विराज रोकडे, सचिन गाढेकर, यश परदेशी, राजन साळुंके यांच्यासह परिसरातील नागरिकांनी विशेष परिश्रमासा उस्फुर्त सहभाग घेऊन यंदाच्या वर्षीचा गणेशोत्सव भक्तीसह भविष्यातील बदलांचे संकेत देणारा बनविला.