Uncategorized

पी.बी.एम निधीकडून विधवा महिलेची फसवणूक; न्याय मागणिकरिता लाक्षणिक उपोषण.

श्रीरामपूर – मिळेल तिथे मजुरी करून उदारनिर्वाह करणारे हे कुटूंब, या कुटुंबाची परिस्थिती बेताची आहे. सदर महिला अडाणी अशिक्षित आहे. त्यांना लिहिता वाचता येत नाही. त्यांची सासू आजारी असल्याने त्यांना पैशाची गरज होती. त्यामुळे पी.बी.एम निधी लिमिटेड येथे सोने मुरणी, ठरले वजन १ ग्रॅम ८०० मिली गहाण ठेऊन रक्कम घेतली. त्यावेळेस सदर पी.बी.एम निधी लि. त्यांनी एक पावती दिली. सदर पावतीवर केवळ व्हॅल्युअरची सही असून मॅनेजरची सही नाही. पी.बी.एम निधी लि. येथे मणीपोत वजन ३ ग्रॅम गहाण ठेऊन रक्कम घेतली. त्यावेळेस सदर पी.बी.एम निधी लि. यांनी एक पावती दिली. सदर पावतीवर व्हॅल्युअरची सही आहे. मॅनेजरची सही नाही. पी.बी.एम निधी लि. येथे एक सोने वेढा, सोने झुबे, टॉप्स, एक जोडे वजने १३ ग्रॅम ५०० मिली गहाण ठेऊन रक्कम घेतली. त्यावेळेस पी.बी.एम निधी लि. यांनी पावती दिली नाही. सदर पावतीवर केवळ व्हॅल्युअरची सही असून मॅनेजरची सही नाही. पी.बी.एम निधी लि. येथे बुगड्या वजन १ ग्रॅम ५०० मिली गहाण ठेऊन रक्कम घेतली. त्यावेळेस सदर पावतीवर केवळ व्हॅल्युअरची सही असून मॅनेजरची सही नाही. दरम्यानच्या काळात या महिलेचा मुलगा विजय संजय वैरागर याला इलेक्ट्रीक शॉक बसल्याने तो गंभीर आजारी होता.या महिलेने पी.बी.एम निधी लि. यांच्याकडे वारंवार जाऊन पैसे भरणार आहे, असे सांगितले होते. घरातल्या व्यक्तीच्या आजाराबाबतही सांगितले असता त्यावर पी.बी. एम निधी लि. यांनी भरोसा व विश्वास दिला की आमचे काही मुद्दल व व्याज निघते ते घेऊन तुमचे सोने परत देऊ. संबंधांनी सोने सोडवून घेण्याकरिता पी.बी.एम निधी लि. यांच्या कार्यालयात मध्ये गेले त्यांना सांगितले की आम्ही तुमचे सोने विकून टाकले आमचे पैसे वसूल केले आहे अशी नोटीस पेपरला दिली होती. त्यांना वैयक्तिक कोणतीही नोटीस न देता केवळ सोन्याचे भाव उच्चांकी गेले असल्याने या महिलेच्या आडाणी पणाचा गैरफायदा घेऊन स्वतःचा फायदा करण्याकरिता त्यांचे सोनेतारण विकून टाकले. अशी तक्रार सिंधू वैरागर या विधवा महिलेने केली आहे. सोने कितीला विकले, थकबाकी किती होती, कोणलाही माहिती दिली नाही.पी.बी.एम निधी लि. यांच्यावर पोलिस अधिकाऱ्याने त्यांच्याविरूध्द कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी सदर महिलेने आरोपीवर कायदेशिर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना कडक शासन व्हावे, या मागणीकरिता पी.बी.एम निधी लि. मेनरोड या ठिकाणी दररोज लाक्षणिक उपोषण सुरू करित आहे. असे निविदात नमूद केले आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!